दारू तस्करांनी वाहनाने नागभीड चे ठाणेदार छत्रपती चिडे यांना चिरडले


- दारू तस्कर कुरखेडा येथील असल्याची चर्चा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
नागभीड़ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक छत्रपती किसन चिड़े (४०) यांच्यावर  ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८. ३० वाजता दारू तस्करांनी वाहनाने प्राणघातक हल्ला केला . यात ठानेदार चिड़े जागीच ठार झालेत. 
आज सकाळी छत्रपती चिड़े यांना अवैध दारू येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच दारू पकडण्यासाठी गेले असता दारू तस्करांनी स्कार्पियो वाहन ठाणेदार छत्रपती चिडे यांच्या अंगावर नेले. यात ठाणेदाराचा जागीच मृत्यु झाला. वृत्त लिहेपर्यंत गाडीचा पंचनामा व चौकशी सुरु होती .  नागरिकांकड़ूंन मिळालेल्या माहितीनुसार कुरखेडा येथील दारू विक्रेत्याची स्कार्पियो आसल्यची माहिती मिळाली. या घटनेनंतर आरोपीच्या विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी काय कठोर पावले उचलतात याकड़े पोलिस विभाग व नागरिकांचे लक्ष लागले आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-06


Related Photos