महत्वाच्या बातम्या

 माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास करीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन नामेवार यांचा भाजपात प्रवेश


- एटापल्ली तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार

-  एटापल्ली तालुका अध्यक्ष यांच्या सह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून युवक काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष मोहन नामेवार यांच्या सह एटापल्ली तालुक्यातील विविध गावातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास करीत राजमहाल अहेरी येथे नुकताच झालेल्या एका प्रवेश कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केले, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. 

यावेळी बोलतांना राजे साहेब मनाले, माझ्यावर विश्वास करून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे, तुमचा भ्रमनिरास कधीही होहू देणार नाही, आपल्या सरकारच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्यातील प्रत्येक गावांत विकासकामे व्हावे, यासाठी मी कटिबद्ध आहे, संकटात कधीही आवाज द्या तुमच्या मदतीसाठी मी सदैव तयार आहे, असे प्रतिपादन राजेंनी यावेळी केले.

या प्रवेश कार्यक्रमाला जेष्ठ नेते प्रकाश गुडेलीवार, भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, तोडसाचे उपसरपंच प्रशांत आत्राम, बाबुराव गंपावार, अशोक पुल्लूरवार, उशना मेडीवार, नगरसेवक अमोल गुडेलीवार, मुकेश नामेवार, संतोष मद्दीवार, क्रिष्णा मंनचालवार, प्रशांत ढोंगे, गुड्डू ठाकरे, श्रीकांत नामनवार, विकास तोडसाम सह एटापल्ली आणि अहेरी तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos