गेलेली संधी पुन्हा येत नाही, तेव्हा विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आजची गुंतवणूक हीच उद्याच्या यशाची पक्की खात्री आहे. आपल्या गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातील, ग्रामीण व दुर्गम भागातील पद्मश्री पुरस्कारा साठी निवड झालेल्या डॉ परसराम खुणे यांचं उदाहरण  देत ते म्हणाले की जग आपली दखल घेईल असं काहीतरी केलं पाहिजे.  कलावंत विद्यार्थ्यांची स्तुती करताना ते म्हणाले की कलावंताची कलाकृती हे त्याच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब असते. असे मौलिक मार्गदर्शन अध्यक्ष स्थानावरून बोलताना मान.मोतीलाल कुकरेजा यांनी केले.कलागुणांचा गौरव सोहळा म्हणजेच पुरस्कार वितरण होय. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बघून स्वतः मध्येही विजयाची भूक निर्माण होते, आणि यातून स्वतःला स्पर्धेसाठी तयार करण्याचा मार्ग प्राप्त होतो. असे संस्थेचे उपाध्यक्ष मान. जगदीश शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले .

प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका प्रास्ताविकातून विशद करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा म्हणून महाविद्यालयातील विविध विभाग अनेक उद्बोधन, मार्गदर्शन व स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करतात. अशा कार्यक्रमांतून नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना  पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. सांस्कृतिक विभाग तसेच आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ जयदेव देशमुख यांनी संपूर्ण शैक्षणिक सत्रातील विविध विभागांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. या कार्यक्रमात महाविद्यालयात आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना तसेच विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी महाविद्यालय प्रतिनिधी विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरविण्यात आले.  प्रा. श्रीकांत पराते यांनी विजेत्या स्पर्धकांची यादी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम गहाने यांनी केले तर पाहुणे व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. हितेंद्र धोटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी परिषद सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

" />

"/>
महत्वाच्या बातम्या

 आदर्श महाविद्यालयात वार्षिक उत्सव संपन्न

- यशस्वी होण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण परिश्रमाची गरज - डॉ. संजय सिंग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : पायात श्रृंखला बांधलेल्या हत्तीचा उदाहरण देत जोपर्यंत मनाने स्वीकारलेली गुलामी व कमीपणा तोडून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण सर्वार्थाने सिद्ध होत नाही.  यशस्वी होण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण परिश्रमाची गरज असते. ज्यांनी हे केलं ते जगात सिद्ध झालेत. श्रीरामचंद्र, कृष्ण,  गौतम बुद्ध, महावीर जैन,  महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांचे जीवन व कार्य यातून हे सिद्ध होते. विद्यार्थ्यांनी विचारांचे वारसदार व्हावे.  ध्येय निश्चित करून त्याचा पाठलाग करावा व यशस्वी व्हावे." असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय सिंग यांनी केले. ते स्थानिक आदर्श महाविद्यालयात वार्षिक युवा महोत्सवात बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. कार्यक्रम नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान.मोतीलाल कुकरेजा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्थाध्यक्ष मान. केवळरामजी घोरमोडे, उपाध्यक्ष मान. जगदीशजी शर्मा, सहसचिव मान. ओमप्रकाश अग्रवाल, सदस्य मान. अ. जहीर शेख, मान. ॲड. अतुल उईके, मान. डॉ. इंदरप्रितसिंघ टुटेजा, मान. योगेश नागतोडे, मान. जयभाई पटेल, प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा, डॉ. जयदेव देशमुख व विद्यार्थी परिषदेची सभापती कु. माधुरी यशवंत ढोरे मंचावर उपस्थित होते.

गेलेली संधी पुन्हा येत नाही, तेव्हा विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आजची गुंतवणूक हीच उद्याच्या यशाची पक्की खात्री आहे. आपल्या गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातील, ग्रामीण व दुर्गम भागातील पद्मश्री पुरस्कारा साठी निवड झालेल्या डॉ परसराम खुणे यांचं उदाहरण  देत ते म्हणाले की जग आपली दखल घेईल असं काहीतरी केलं पाहिजे.  कलावंत विद्यार्थ्यांची स्तुती करताना ते म्हणाले की कलावंताची कलाकृती हे त्याच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब असते. असे मौलिक मार्गदर्शन अध्यक्ष स्थानावरून बोलताना मान.मोतीलाल कुकरेजा यांनी केले.कलागुणांचा गौरव सोहळा म्हणजेच पुरस्कार वितरण होय. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बघून स्वतः मध्येही विजयाची भूक निर्माण होते, आणि यातून स्वतःला स्पर्धेसाठी तयार करण्याचा मार्ग प्राप्त होतो. असे संस्थेचे उपाध्यक्ष मान. जगदीश शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले .

प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका प्रास्ताविकातून विशद करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा म्हणून महाविद्यालयातील विविध विभाग अनेक उद्बोधन, मार्गदर्शन व स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित करतात. अशा कार्यक्रमांतून नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना  पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. सांस्कृतिक विभाग तसेच आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ जयदेव देशमुख यांनी संपूर्ण शैक्षणिक सत्रातील विविध विभागांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. या कार्यक्रमात महाविद्यालयात आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना तसेच विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी महाविद्यालय प्रतिनिधी विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरविण्यात आले.  प्रा. श्रीकांत पराते यांनी विजेत्या स्पर्धकांची यादी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीराम गहाने यांनी केले तर पाहुणे व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. हितेंद्र धोटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी परिषद सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  Print

News - Gadchiroli

Related Photos