महत्वाच्या बातम्या

 यूट्यूबवर व्हिडीओ पाहून १२ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नागपूरमधील सोमवारी क्वार्टर परिसरात अग्रण्य सचिन बारापात्रे हा १२ वर्षीय मुलगा आपल्या आई-वडिलांसह राहत होता. २५ जानेवारीला १२ वर्षीय मुलाचे आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा अग्रण्य गच्चीवर गळफास घेतलेल्या स्थितीत शेजाऱ्यांना आढळला. त्याला नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी केलेल्या तपासात अग्रण्याला मोबाईलचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. गळ्यात गळफास लटकवून तो कसा काढायचा याचे व्हिडीओ तो सतत बघत होता. अग्रण्य तसा प्रयत्न करायला गेला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला, असे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी नागपूरमधील सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सक्करदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांनी सांगितल्यानुसार, अग्रण्यवर मनोरुग्ण डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. त्याला यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्याचा सवय होती. त्याने डोळे बांधून हात कसा सोडवायचा, हा व्हिडीओ पाहिलेला आढळला आहे. आईच्या साडी आणि ओढणीने तो घरात झोपाळा बांधायचा आणि त्याबरोबर खेळायचा. ही आत्महत्या नसून अपघात आहे, अशी माहिती धनंजय पाटील यांनी दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos