महत्वाच्या बातम्या

 दुर्गा मातेच्या स्थापना दिनाकरिता शिधा सामग्रीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : सार्वजनिक दुर्गा माता देवस्थान टिळक चौक आरमोरी येथील स्थापना दिनानिमित्त महाप्रसादासाठी शिधा सामग्री जमा करताना अष्टविनायक गणेश उत्सव नेहरू चौक आरमोरी येथील मंडळाचे सदस्यांनी आज वार्डातील प्रत्येक घरा घरातून तांदूळ, पीठ तिखट, डाळ आणि इतर देणगी मागण्यास सुरवात केली. आणि हि जमा झालेली शिधा, सामग्री दुर्गा माता देवस्थान स्थापना दिनाला होणाऱ्या सामुहिक महाप्रसादाचे कार्यक्रमाला ३० जानेवारी २०२३ ला अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ नेहरू चौक च्या वतीने दुर्गा माता देवस्थानला देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला शिधा सामग्री जमा करताना प्रफुल मोगरे, आकाश हेमके, गणेश तिजारे, अक्षय हेमके, सुमित आंबोरकर, स्वप्नील हेमके, चेतन तिजारे, चंदू आकरे, सुरेश हेमके, वेदांत कापकर आदी सदस्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos