कोलकाता - अमृतसर एक्स्प्रेसने ट्रॅकवर काम करणाऱ्या तीन गँगमनला चिरडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / लखनऊ : 
उत्तर प्रदेशात रेल्वे ट्रॅकवर काम करत असणाऱ्या तीन गँगमनला कोलकाता – अमृतसर एक्स्प्रेसने चिरडल्याची दुर्घटना संदिला आणि उमरतली रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गँगमन कोणत्याही ब्लॉकशिवाय ट्रॅकवर काम करत होते. अमृतसरमध्ये दसऱ्याला रेल्वेने ट्रॅकवर उभ्या लोकांना उडवल्याच्या घटनेनंतर आता ही घटना समोर आली आहे.  
दुर्घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी चौकशी आदेश देण्यात आली असल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ता दीपक कुमार यांनी दिली आहे. ट्रॅकवर दुरुस्ती किंवा देखभालीचं कोणतंही काम करण्याआधी संबंधित विभागाकडून ब्लॉक घेतला जातो. ट्रॅकवर काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्या दरम्यान कोणत्याही ट्रेन त्या मार्गाने जाऊ दिल्या जात नाहीत. मात्र ‘तिघे गँगमन कोणत्याही ब्लॉकशिवाय ट्रॅकवर ड्रिलिंगचं काम करत होते’, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.  Print


News - World | Posted : 2018-11-05


Related Photos