एसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती


-महिनाअखेरीस जाहिरात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून येत्या वर्षांत ६ हजार ९४९ चालक-वाहकांची भरती केली जाणार आहे  तसेच वर्ग-३ मधील ६७१ जागाही भरल्या जाणार आहेत. नोव्हेंबरअखेरीस जाहिरात काढल्यानंतर अर्ज स्वीकारणी व अन्य प्रक्रिया पार पाडल्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात येतील.  अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. 
एसटी महामंडळात  जवळपास ३८ हजार चालक व ३४ हजार वाहक आहेत. मात्र वर्षांला निवृत्त होणारे कर्मचारी, कामाची वाढलेली व्याप्ती, बसगाडय़ांची व फेऱ्यांची संख्या पाहता मोठय़ा संख्येने चालक-वाहकांची गरज आहे. महामंडळाने पाच महिन्यांपूर्वी तीन हजार ५४ चालक-वाहक पदे भरण्याची घोषणाही केली. मात्र, ही पदे भरण्याची प्रक्रिया काही कारणास्तव थांबली. आता महामंडळाने कोकण सोडता राज्यातील अन्य भागांसाठी चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.  ही भरती पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत होणार आहे. यात मुंबईचाही पुन्हा विचार केला जात आहे. चालक-वाहकांव्यतिरिक्त वर्ग-३ मधील वरिष्ठ लिपिक, यांत्रिकी विभागातील जागांसह अन्य पदेही भरली जातील. वर्ग-३ मधील ६७१ जागा भरण्यात येणार आहेत. अधिकारी वर्गाच्याही ६९ जागा भरल्या जातील. अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. 



  Print






News - Rajy | Posted : 2018-11-05






Related Photos