आणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / भोपाल : 
पांढरकवड्यातील ‘अवनी’ (टी-१) या पाच वर्षांच्या वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजतानाच आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेमध्ये गावकऱ्यांनी वाघिणीवर हल्ला करुन बेशुद्ध अवस्थेतील वाघिणीवर ट्रॅक्टर चढवून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीलीभीत जिल्ह्यातील चलतुआ गावातील देवानंद नावाची व्यक्ती सायकलवरून आपल्या गावी जात असताना या वाघिणीने त्याच्यावर हल्ला केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे होते. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या देवानंद यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी वाघिणीवर हल्ला करुन तिचा जीव घेतला. त्यामुळे  हल्ल्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी वाघिणीला घेरले आणि तिच्यावर काठ्या लाठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील वाघिणीवर ट्रॅक्टरही चालवला. त्यातच त्या वाघिणीचा मृत्यू झाला. दुधवा हे व्यघ्र अभयारण्य घोषित झाल्यानंतर १० वाघांचा अकाली मृत्यू झाला आहे. अभिनेता रणदीप हुड्डाने गावकऱ्यांनी जीव घेतलेल्या वाघिणीच्या मृतदेहाचा फोटो ट्विट केला आहे.
वाघिणीला गावकऱ्यांनी हल्ला करुन मारल्याचे समजताच दुधवा राष्ट्रीय उद्यानाचे उपनिदेशक महावीर कौलदगी आणि इतर वन अधिकारी घटनास्थळी पोहचले. या वाघिणीला लाठ्यांनी हल्ला करुन ठार केल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या वाघिणीचा जीव घेणाऱ्या गावकऱ्यांविरोधात वन्यजीव अधिनियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. तर गावकऱ्यांनी या परिसरात आम्ही वाघिणीचा वावर असल्याने आमच्या जीवाला धोका होता. यासंदर्भात आम्ही वारंवार वनविभागाकडे तक्रार केली होती मात्र त्यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
   Print


News - World | Posted : 2018-11-05


Related Photos