महत्वाच्या बातम्या

 शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील : माजी मंत्री वडेट्टीवार


- शिक्षक मतदार संघ निवडणूक- अडबालेंच्या प्रचारार्थ मतदारांचा मेळावा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या हक्काच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. या रास्त मागण्यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीने शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन वेळोवेळी आंदोलन करून न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील लढवय्ये सुधाकर अडवाले यांना उमेदवारी जाहीर या उमेदवारांना आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवा असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. ते सिंदेवाही येथे आयोजित शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मेळावा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. 

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचे प्रचारार्थ आज सिंदेवाही येथे सिंदेवाही - सावली येथील शिक्षक मतदारांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. आयोजीत कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट, मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्या शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष योगेंद्र जयस्वाल, संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. केशव शेंडे, कार्यवाहक श्रीहरी शेंडे, अशोक साळवे, सूरेश निनावे, अजय मेंढे, दत्तात्रय खरवडे, रोमदेव चापले चंद्रकांत शिंदे, केशव ठाकरे, प्रा. पाथोडे ,बाबुराव परसावार, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व म्हणून सुधाकर अडबाले हे सर्वांना परिचित असून त्यांना महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारी ही शिक्षकांना न्याय देणारी आहे. तसेच केंद्र सरकार लागू करीत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वपूर्ण असून यावेळी परिवर्तनाचा निश्चय शिक्षकांनी केला पाहिजे. 

शिक्षक या बुध्दीजिवी वर्गाची ही निवडणूक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राबद्दल तळमळ असलेला व शिक्षकांच्या समस्यांची जाण असलेला उमेदवार रिंगणात असल्याने अडबाले यांच्या बाजूने उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. यावेळी शिक्षक आमदार निवडणुकीत परिवर्तनाची लाट दिसून येत आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकित अडबाले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत पोहोचवा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवडूजी मांडवकर, प्रास्ताविक सोनुले,तर आभार किंदरले यांनी मानले. यावेळी बहुसंख्य शिक्षक मतदार उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos