नागेपल्ली येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विदर्भस्तरीय भव्य रात्रकालीन व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आलापल्ली : एकता व्हॉलीबॉल क्लब, नागेपल्ली द्वारा आयोजित विदर्भस्तरीय भव्य रात्रकालीन व्हॉलीबॉल सामने धवडे यांच्या भव्य पटांगणावर आयोजित केले होते. या स्पर्धेचे उदघाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते काल नागेपल्ली येथे संपन्न झाले, ह्यावेळी बोलतांना राजे म्हणाले आपल्या क्षेत्रातून प्रत्येक क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर खेळाडू जावे ह्यासाठी नेहमीच मी प्रत्येक खेळाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी नेहमीच आर्थिक मदत केली आहे. हे करीत असतांना इतरांप्रमाणे मी राजकीय स्वार्थ कधीच ठेवला नाही, मी पालकमंत्री असतांनाच गडचिरोली येथे भव्य स्टेडियमसाठी निधी मंजूर करून बांधकामाला सुरुवात केली होती. ह्याची आठवण ही ह्यावेळी राजेंनी केली.
ह्या स्पर्धेत महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड येथील अनेक नामवंत व्हॉलीबॉल संघांनी सहभाग घेतला आहे. याप्रसंगी युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपा तालुका अध्यक्ष रविभाऊ नेलकुद्री, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, भाजपा जिल्हा सचिव विनोद अकणपल्लीवार, सागर डेकाटे, किशोर रापेल्लीवार सह एकता क्लबचे सदस्य व नागेपल्ली येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli