बेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती : 
जिल्यातील  बेलोरास्थित दोन गोदामावर अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री धाड  मारून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करून  दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले . गोदाममालक युसून शाह लुतूब शाह रा.यास्मीननगर व अकील अहमद अब्दुल रशीद  रा. ईस्माईल चौक, जुनी बस्ती बडनेरा याचा सहभाग आहे.
एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे व सचीन केदारे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव यांनी पोलीस संरक्षणात आरको गॅरेजमागील दोन गोदामावर धाड टाकली. दोन्ही गोदामात तंबाखूजन्य गुटख्याचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात आढळून आला. एफडीएने युसून शाह याच्या गोदामातून १३ लाख ३० हजारांचा तर अकील अहमद याच्या गोदामातून ३१ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.  या कारवाईसाठी पोलिसांनी सरंक्षण दिले होते. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक सतीश इंगळे यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी उपस्थित होता.  
एफडीएने दोन्ही गोदाम मालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता हा गुटख्याचा माल मध्यप्रदेशातून आणल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्या दोघांविरुध्द अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ कारवाई करण्यात आली.    Print


News - Rajy | Posted : 2018-11-05


Related Photos