महत्वाच्या बातम्या

 नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथे आयोजित शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न


- शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणजे गाणार  : आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी एन. डी. हॉटेल, चंद्रपूर येथे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व महायुती समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ आयोजित शिक्षकांच्या स्नेहमिलन सोहळ्यात मतदार शिक्षक बंधू-भगिनींना नागो गाणार यांना पसंती क्र. ०१ चे मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती केली. याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर सर्वश्री भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी विधानपरिषद सदस्य अनिल सोले , आमदार किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य गुरुदास कामडी, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर, महर्षी शिक्षण संस्थेचे संचालक गिरीश चांडक व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बंटी म्हणाले की, येत्या ३० जानेवारीला मतदान करायचं आहे. मतदानाचा दिवस जवळ आलेला असून, नागो गाणार यांच्या पाठीशी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्व उभे आहेत आणि अनेक संघटनेचा पाठिंबा त्यांना मिळतोय, दुसरीकडे आपण बघाल तर महाविकास आघाडी व अन्य पक्षांमध्ये उमेदवारांबाबत एकमत नसून त्यांच्यात समन्वय देखील नाही. नागो गाणार यांना आपण सर्व गेल्या १२ वर्षांपासून बघतोय प्रामाणिकपणे आपल्या शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून गाणार सरांची ओळख झालेली आहे. स्वतः वेतन उचलत नाहीत जोपर्यंत माझ्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत मी सुद्धा पेन्शन घेणार नाही अशा ठाम भूमिकेत राहणारे आपले गाणार आहेत. आपण सर्व फार समझदार आहात २२ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत, केंद्रात व राज्यात भाजपा-महायुतीचे सरकार आहे, आता कोणी म्हणेल की आम्ही निवडून आलोत की आम्ही करू, जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हाच काही करू शकले नाहीत, २००५ पासून पेन्शन योजना बंद झाली तेव्हा केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार होते. २०१४ पर्यंत तुम्ही विषय मार्गी लावू शकले नाही, आज काय दिवे लावणार आहेत. गाणार सरांसारखं नेतृत्व कदाचितच मिळते, मी आपल्याला नम्र विनंती करतोय ३० तारखेला कशाचाही विचार न करता माणूस ओळखा, कोण संघर्ष आपल्यासाठी करतोय, कोण प्रामाणिकपणे आपले विषय सभागृहात मांडतोय, कोण प्रामाणिकपणे आपल्यासाठी झटतोय जेव्हा या सर्व गोष्टींचा आपण विचार करू तेव्हा एकच नाव समोर येईल ते म्हणजे नागो गाणार . येत्या ३० तारखेला त्यांच्या नावासमोरील पसंती क्र. ०१ चे मतदान करून त्यांना परत तिसऱ्यांदा आपल्या सर्वांचं नेतृत्व करायची संधी आपण उपलब्ध करून द्यावी अशी नम्र विनंती आमदार बंटी यांनी सर्वांना केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos