पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करणाऱ्या महाराष्ट्रातील जवानाला अटक


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  भारत-पाकिस्तान सीमेलगत असणारे रस्ते आणि इतर माहिती पाकिस्तान गुप्तहेराला देण्याच्या संशयावरुन एका बीएसएफ जवानाला अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी जवानावर बीएसएफची गुप्तचर शाखा पाळत ठेवून होते. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवान हा महाराष्ट्रातील रेनपुरा गावांतील रहिवासी आहे. बीएसएफच्या २९ व्या बटालियनमध्ये पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये कर्तव्यावर होता. आरोपीने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला सीमेलगतच्या रस्त्यांचे फोटो, बीएसएफ अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक आणि अन्य गुप्त माहिती दिली. आरोपीने आपल्या फोनद्वारे ही माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी जवानावर गोपनीय माहिती कायदा आणि इतर कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    Print


News - World | Posted : 2018-11-05


Related Photos