'टी-१'च्या बछड्यांचा शोध सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ :
'टी-१' वाघीण ठार झाल्यानंतर तिच्या बछड्यांचा शोध घेतला जात आहे. रविवारी वरुड धरणाजवळच्या जंगलात हे बछडे असल्याचे संकेत मिळाले. दिवसभर वन विभागाच्या टीमने या भागात बछड्यांचा शोध घेतला. पण, बछडे कुठेही आढळले नाहीत. 
वाघिणीला गोळी लागल्यानंतर तिने आरोळी फोडली. ही आरोळी ऐकून बछडे आक्रमक होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. म्हणून शनिवारी सकाळीच बछड्यांना शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. हे बछडे अकरा महिन्यांचे असून केवळ लहान प्राण्यांची शिकार करू शकतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह आई नसल्याने कसा होत असणार अशी काळजी वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, शनिवारी वाघीण ठार झाल्यानंतर बोराटी ते राळेगावदरम्यान या परिसरातील दुसरा वाघ 'टी-२' दिसून आला. त्यामुळे सराटी, बोराटी, भूलगड, लोणी, खैरगावसह परिसरातील गावांमधील गावकरी हादरले आहेत. 
मागील दोन महिन्यांपासून लोणी गावाजवळ मिशन टी-१ चा कॅम्प होता. हत्ती, इटालियन श्वान, शूटर, वनाधिकारी गावात तळ ठोकून होते. त्यामुळे गावात दररोज गजबज राहात होती. पण, वाघीण ठार झाल्यानंतर ही गजबज संपली. रविवारी या परिसरात सर्वत्र शांतता दिसून येत होती. 

   Print


News - Rajy | Posted : 2018-11-05


Related Photos