पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीने सरकार मालामाल : टॅक्समधून सरकारची ३.३५ लाख करोड रुपयांची कमाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
सरकारच्या तेल कंपन्यांनी आज चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवला आहे. देशभरात इंधनाच्या किंमतीचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. अनेक शहरात पेट्रोलचा दर शंभरीपार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांची किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर झाला आहे.  
21 जुलै 2021 रोजी इंडियन ऑइल वेबसाइटनुसार, बुधवारी इंधनांच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. चौथ्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरांना ब्रेक लागला आहे. 
या आठवड्यात लोकसभेत सरकारने सांगितलं की, पेट्रोल डिझेलमार्फत टॅक्स कलेक्शन 88 टक्क्यांहून अधिक झालं आहे. सरकारला 3.35 लाख करोड रुपये झाले आहे. हा आकडा 31 मार्च 2021 पर्यंतचा आहे. गेल्या एका वर्षात पेट्रोलच्या एक्साइज ड्यूटी 19.98 रुपये प्रतिलीटरने वाढून 32.9 रुपये प्रती लीटरपर्यंत पोहोचले. या अगोदर एप्रिल 2019 ते मार्च 2020 दरम्यान पेट्रोल-डिझेलवरील टॅक्सकडून सरकारला 1.78 लाख करोड रुपये जमा झाले आहेत. 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे घरगुती इंधनात आणि पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ झाली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी इंधनाच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. आज तिसरा दिवस आहे ज्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा दर स्थिर आहेत. जुलै महिन्यात आता पेट्रोलच्या दरात एकूण 9 वेळा वाढ झाली आहे. डिझेल पाच वेळा महागलं आणि एक वेळा स्वस्त झालं आहे. याच्या अगोदर जून आणि मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर जवळपास 16-16 वेळा दरवाढ झाली आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-07-21


Related Photos