एटीएममध्ये चोरी : चोरी करण्याकरिता एटीएम मशिनचा घडवला स्फोट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
चोरट्यांनी चोरीच्या बहाण्याने एटीएम मध्ये स्फोट घडवून आणला. चाकण येथे एटीएममध्ये रात्री अचानक स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. एटीएमच्या खोलीच्या दरवाजाच्या काचा आणि पत्रे लांबपर्यंत उडून गेलेत, एवढा मोठा स्फोट होता. चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील ही घटना घडली. 
चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील भांबोली फाटा येथे चोरट्यांनी चोरीच्या बहाण्याने एटीएम मशिनचा स्फोट केला असून मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास हिताची कंपनीच्या एटीएम मशिनमध्ये चोरट्यांनी स्फोट करत एटीएम मशिन फोडली आहे.
हिताची बँकेच्या एटीएमचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात एटीएमसह समोरील काचांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. दरम्यान, जीवीत हानी टळली. स्फोटाची माहिती मिळताच महाळुंगे पोलीस घटनास्थळी दाखल दाखल झाले आहेत.
स्फोटात एटीएम मशिनचा अर्धा भाग फुटला असून काचांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटात एटीएम मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली. तर काही रक्कमही न फुटलेल्या अर्धांभागात सुरक्षित राहिली आहे. परंतु यात एकूण किती रक्कम चोरीला गेली हे अद्याप समजू शकले नाही. 
एटीएम चोरीच्या वाढत्या घटनांनी एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या एटीएम ला सीसीटीव्ही कॅमेरे सह सुरक्षा रक्षकही तैनात नसल्याने एटीएम फोडीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे एटीएम चोरीच्या वाढत्या घटनांनी मात्र पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान वाढले आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-07-21


Related Photos