महत्वाच्या बातम्या

 कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा नागपुरात


- 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणार आयोजन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : यंदाची कै.भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक चिटणवीस पार्क येथे 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धा आयोजनाची तारीख निश्चित करण्यात आली. या बैठकीला विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. डी. एस. सेलोकार, विदर्भ खो-खो असोसिएशन तथा आयोजन सचिव सुधीर निंबाळकर, नागपूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव प्रशांत जगताप यांच्यासह गठित समितीचे सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते.

स्पर्धा सुनियोजित व यशस्वीरीत्या आयोजीत होण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करा. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तांत्रिक, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, प्रसिद्धी व स्मरणिका, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सेवा आदी समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून स्पर्धेची तयारी करण्यात येणार आहे.  या समित्यांनी नियोजनाची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सुचना या बैठकीत जिल्हाधिका-यांनी दिल्या.  

राज्यातील खो-खो खेळाडूंना राज्य स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी तसेच त्यांना व क्रीडाप्रेमींना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य व खेळ पाहण्यास मिळावा यासाठी राज्यस्तरावर वरिष्ठ गटातील पुरुष व महिला तसेच १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धा कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा या नावाने दरवर्षी महाराष्ट्र व विदर्भ खो-खो असोसिएशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे आयोजन विदर्भातील नागपुरात होणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos