महत्वाच्या बातम्या

 समाज माध्यमाच्या वापराबाबत निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : मतदार जनजागृती व निवडणूक विषयक कामांसाठी आजकाल समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. निवडणूकीशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना या माध्यमाच्या वापराबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबईच्या स्वीप पथकाने विकास भवन येथे प्रशिक्षण दिले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, स्वीपचे राज्य समन्वयक साधना गोरे, प्रणल सलगरकर, नायब तहसिलदार अतुल रासपायले, आर्वीच्या नायब तहसिलदार स्मिता माने, आष्टीचे नायब तहसिलदार दिपक काळुसे यांच्यासह निवडणूक विषयक कामकाज पाहणारे जिल्ह्यातील सर्व नायब तहसिलदार, ऑपरेटर, समाजमाध्यम समन्वयक उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ व सर्व तालुक्यातील निवडणूक विषयक कामाचे ऑपरेटर, निवडणूक नायब तहसीलदार, निवडणूक लिपिक व मतदार नोंदणी अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे समाज माध्यम अकाऊंट हाताळणाऱ्या समन्वयकांना राज्याच्या पथकाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. यात मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाचे विविध समाज माध्यमे म्हणजेच सोशल मीडिया अकाउंट जसे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर व युट्युब हे खाते कसे हाताळावे व त्याद्वारे जास्तीत जास्त मतदारांमध्ये जनजागृती कशी करावी व जिल्हास्तर तसेच मतदार नोंदणी विषयक कामकाजांचे विधानसभा स्तर व तालुका स्तरावरील व बीएलओ यांच्या स्तरावरील उपक्रमांची माहिती, फोटो व व्हिडिओ या माध्यमांमधून कसे पोस्ट करावेत व त्यातून जास्तीत जास्त जनजागृती करून नव मतदारांना आकर्षित करणे व त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेणे याबाबतची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.





  Print






News - Wardha




Related Photos