महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी शहरात भव्य ईको पार्क होणार : नगरसेवक आशिष पिपरे यांच्या मागणीला यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : येथे वनमंत्री लोकनेते नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली चामोर्शी शहरात वन विभागाच्या वतीने वन विभागाचे पडीत असलेले व गेल्या अनेक वर्षांपासून सौंदर्य करण करिता प्रलंबित असलेल्या वन विभागाचे दुर्लक्षित असलेला बगीचास मुल व बल्लारपूर प्रमाणे इको पार्क मध्ये परिवर्तन करण्याची मागणी येथील नगरसेवक आशिष पिपरे यांनी आज मंत्रालय मुंबई येथे सुधीर मुनगंटीवार यांचे वन विभागाचे बैठकीत पत्राद्वारे केली. यावेळी त्यांनी सदर गडचिरोली जिल्ह्यातील या नाविण्यपूर्ण मागणीस पुढील कारवाई करिता सबंधित वन विभागाचे अधिकारी यांच्याकडे मंजुरी करिता यांच्याकडे पाठवले व ना. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री यांनी चामोर्शी शहरात मुल व बल्लारपूर प्रमाणे भव्य इको पार्क नक्कीच तयार करणार असे आश्वासन दिले. या वेळी नगरसेवक आशीष यांनी सांगितले गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या मोठ्या संख्येने वाढली परंतु शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही व शहरात नागरिकांना निवांत क्षणी वेळ घालवण्यासाठी व शहराबाहेर फिरण्यासाठी व नागरिकांच्या मनोरंजनासाठी कोणतेही सुयोग्य बगीच्याचे ठिकाण नाही व कोणत्याही लोकप्रतिनिधी यांनी सदर मागणी करून इको पार्क निर्माण करण्या बाबत पाठपुरावा केला नाही या बद्दल खंत व्यक्त केली व आज सदर मागणी आज नगरसेवक आशीष पिपरे यांनी मंत्रालय मुंबई येथे वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निवेदन सादर करून लावून धरले व सदर मागणीस वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्वतः मंजूरी दिल्याबद्दल त्यांचे चामोर्शी शहरवासीयांच्या वतीने जाहीर आभार मानले जात आहे व नगर सेवक पिपरे यांचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos