चाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले


 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धुळे  : 
भररस्त्यावरील अायसीअायसीअाय बँकेचा एटीएमचा फाउंडेशन करवतीने कापून चाेरट्यांनी २३ लाखांच्या रकमेसह चक्क एटीएम मशीनच चाेरून नेले.  रामवाडीतील भररस्त्यावरील एटीएम सेंटरमधून पैशांसह यंत्रच चाेरीला गेल्याने खळबळ उडाली अाहे.
 या बँकेच्या सीसीटीव्हीची यंत्रणा थेट मुंबईत जाेडली असल्याने चाेरट्यांनी नेमके काय केले, हे कळायला पाेलिसांना मार्गच उरला नाही. श्वान पथकालाही बाेलावण्यात अाल. तिथे सापडलेल्या रुमालसह करवत श्वानाला हुंगवण्यात अाली. मात्र त्याचाही उपयाेग झाला नाही.  
मालेगाव राेडवरील अग्रसेन पुतळा परिसरातील अास्था हाॅस्पिटल समाेर अायसीअायसीअाय अाणि एचडीएफसी या बँकांचे एटीएम केंद्र हाॅटेल गाैरव शेजारी अाहे. मालेगाव राेड परिसरात दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. एटीएम सेंटरही चाेवीस तास सुरू असते. मात्र तिथे सुरक्षा रक्षक नाही. ही संधी साधून चाेरट्यांनी मध्यरात्री डाव साधला. शनिवारी पहाटे पाच वाजता एटीएम सेंटरच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीचे मालक दुकान उघडण्यासाठी अाले असता त्यांना एटीएम गायब असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती बँकेचे अधिकारी व पाेलिसांना दिली. मात्र सकाळी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क हाेऊ शकला नाही. त्यामुळे एटीएममध्ये िकिती रक्कम हाेती हे स्पष्ट झाले नाही. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दाेन यंत्रे बसवण्यात अाली हाेती. एटीएम केंद्रात खालील बाजूला लाेखंडी राॅड व सिमेंट काँक्रीटने पॅक करून त्यावर नटबाेल्टच्या साहाय्याने यंत्र बसवली हाेती. चाेरट्यांनी त्यापैकी एका यंत्राचे राॅड व नटबाेल्ट करवतीच्या पात्याने कापून दाेराच्या मदतीने संपूर्ण यंत्रच उचलून नेले.
रामवाडीत एकाच ठिकाणी दाेन एटीएम यंत्रे हाेती. त्यातील एक यंत्र चाेरट्यांनी थेट मुळासकट उचलून नेले. तिथे रिकामी झालेली जागा. तसेच यंत्र फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाेलिसांनाही अाढळले नाही.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-04


Related Photos