महत्वाच्या बातम्या

 नमाद महाविद्यालयात गणराज्य दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा गणतंत्र दिन गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. 

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना मानवंदना दिली. प्राचार्यां डॉ. महाजन यांनी देशासमोरील समस्या अवगत करून त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, एकदिलाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले. स्वातंत्र्य चळवळीचा महान वारसा आपल्याला मिळाला आहे. त्याचे जतन करून आपल्याला पुढे जायचे आहे. कोविड सारख्या महामारीवर मात करून पुढे आलो आहोत. पुढेही येणाऱ्या समस्यांवर मात करू, त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. महाजन यांनी केले. 

यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचा प्राचार्या डॉ. महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात गौरव कटरे, मनीष बिसेन, राजकुमार कटरे, प्रदीप कावरे, हर्षल तितिरमारे, खुशबू भाटी, कोमल रहांगडाले, रोशनी मेश्राम, नेहा ठाकरे, मोनू मेश्राम, भावना तुरकर, मीनाक्षी जामरे, प्रगती हुमे, निकिता पटले, श्वेता मेश्राम, वैशाली नागरीकर, शुभांगी नागपुरे, गायत्री वाघाडे, आचल कटरे, अलका राऊत आदींचा समावेश होता. ध्वजारोहण कार्यक्रमाला मानव्य विद्याशाखेच्या प्रमुख डॉ. अर्चना जैन, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. राकेश खंडेलवाल यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एनसीसी चे कार्यक्रम अधिकारी कॅप्टन डॉ. एच पी पारधी यांनी केले.





  Print






News - Gondia




Related Photos