महत्वाच्या बातम्या

 महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय  गणराज्याचा ७४  वा  प्रजासत्ताक  दिन  महावितरणच्या  चंद्रपूर  परिमंडळात  आज उत्साहाने साजरा  करण्यात  आला.  चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांच्या  हस्ते ध्वजारोहन झाले व सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी ध्वजास मानवंदना अर्पण केली. प्रजासत्ताक दिन साजरा करीत मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी संविधान -उददेशिकेचे वाचन केले.

याप्रसंगी अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे (चंद्रपूर प्रविभाग), सुहास म्हेत्रे, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा), चंद्रपूर विभागाचे कार्यकारी  अभियंता सुहास पडोळे, चाचणी विभागाचे  कार्यकारी अभियंता युवराज मेश्राम, वरीष्ठ व्यवस्थापक मा.सं. सुशिल विखार, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी योगेश गोरे व कर्मचारी बंधू मोठया संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos