डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला : वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रकार


 -शिकाऊ डॉक्टर नर्सेस कडुन चुकीचे उपचार
-अखिल कोठारे व मित्र परिवारची मदत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मारेगाव :
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात पायल मेश्राम (२०) या मतिमंद गर्भवती महिलेला प्रसृतीसाठी भरती करण्यात आले होते. तिने गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र दुसऱ्या दिवशी ३१ ऑक्टोबरला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला. 
झरी तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भागातील शिबला या गावातील एका मतिमंद महिलेला गर्भधारणा झाली होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले नाही. ही बाब सामाजिक कार्यकर्ते  अखिल कोठारे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वखर्चाने रुग्णवाहिका करून व काही रुपये खर्चासाठी नातेवाईकांना देऊन पायल मेश्राम वय २० वर्षे या मतिमंद गर्भवती महिलेला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात प्रसृतीसाठी  भरती करण्यात आले होते, प्रसूतीनंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला, तिला पुत्ररत्न होऊन ती आई झाली होती. त्या आईने व तिच्या नातेवाईकांनी त्या बाळाच्या उज्वल भविष्यासाठी अनेक स्वप्ने पाहली होती. तसेच अखिल कोठारे यांनी सपत्नीक, सहकुटुंब यवतमाळ येथे भेट दिली व प्रकृती बद्दल विचारपूस करून कपडे, स्वेटर बाळा उपयोगी सामान घेऊन देऊन पैसे दिले आणि त्या बाळाला दत्तक घेऊन, बारशाचा कार्यक्रमाची तयारी संपूर्ण संगोपन शैक्षणिक खर्च करणार असल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवरून मिळाली. तेव्हा तात्काळ अखिल कोठारे यांनी महिलेचा शिबला येथील चुलत भाऊ संतोष गेडाम, उमरी येथील सामाजिक कार्यकर्ते निरज गुरनुले, लोकमत प्रतिनिधी निलेश वाभीटकर यांना सोबत घेऊन यवतमाळ शासकीय रुग्णालयात भेट दिली असता बालकाचा मृत्य देह तेथील डॉक्टर व कर्मचारी दवाखान्याच्या बाहेर काढण्यासाठी तगादा लावला होता,  राञी पायल मेश्राम चे वडील सटुजी तोडसाम वा एका खाजगी व्यक्ती कडुन अत्यसस्कार केले,  कर्मचाऱ्यांना माहिती विचारली असता कर्मचाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिवसपाळीतील कर्मचाऱ्यांची ड्युटी संपली आम्ही रात्रपाळी चे आहोत असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉक्टरांसंबंधी विचारले असता ते उद्या सकाळी येतील तेव्हा अधिक माहिती त्यांनाच विचारावे असे सांगितले.
जिल्ह्यातील गोर गरीब घरचे रुग्ण यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात, त्यातच आता डेंग्यू ची साथ जिल्ह्यात थैमान घालत आहे, व डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. परंतु येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांतर्फे रूग्णांना व नातेवाईकांना उद्धट वागणूक दिली जाते. व निष्काळजीपणे उपचार केला जातो. अश्याच प्रकारातून डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे एका निष्पाप नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक निर्माण करून अन्य रुग्णांची हेळसांड थांबवावी. अशी मागणी अखिल कोठारे व  नागरिकांतून होत आहे .  

   Print


News - Rajy | Posted : 2018-11-04


Related Photos