महत्वाच्या बातम्या

 अल्प मुदतीच्या पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या ६ हजार २४० लाभार्थ्यांची यादी जाहीर


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या  शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यत प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ६२४० पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची शहानिशा करावी, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम वालदे यांनी कळविले आहे.
ही यादी शेतकऱ्यांच्या माहितीकरीता संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय, पंचायत समिती, चावडी, ग्रामपंचायत व संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द करण्यात आली आहे.
सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे जावळच्या ठिकाणी भेट देवून आपले नांव यादीत आहे किंवा नाही याची शहानिशा करावी. ज्या शेतकऱ्यांचे नांव आहे, त्यांनी आपल्या जावळच्या सरकार सुविधा केंद्रात स्वत: जाऊन आपले आधारकार्डसोबत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेमधून कर्जाची उचल केली आहे. त्यांनी तितक्या वेळेस प्रमाणीकरण करावे व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम वालदे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos