महत्वाच्या बातम्या

 नवनियुक्त सहायक मोटर वाहन निरीक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान


- नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारस पात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, माजी खासदार ब्रिगेडियर सुधिर सावंत आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते अपघातात नागरिकांच्या मृत्यू संख्येबाबत चिंता व्यक्त केली. गेल्यावर्षी नाशिक येथील बस अपघाताचे उदाहरण देत राज्यात रस्ते अपघात आणि नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहेत. सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळेत होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅकस्पॅाट) यावर उपाययोजना कराव्यात. या क्षेत्रामधील रस्त्यांवर जनजागृतीपर वाहतूक सूचना फलके, दिवे, दिशा निर्देशक फलके, अपघात प्रवण क्षेत्र फलक, वेग मर्यादा इ. व्यवस्था करावी. वारंवार अपघात करण्याऱ्या व निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई झाली पाहीजे. रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कार्रवाई करण्यासंदर्भात कायद्यातील तरतुदी तपासून योग्य उपाययोजना कराव्यात.





  Print






News - Rajy




Related Photos