महत्वाच्या बातम्या

 अतिसंवेदनशील आरेवाडा या गावात पोलीस दलाने केले ध्वजारोहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले होते. तसेच २६ जानेवारी दिवशी भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले असल्याने भारत देश लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनले, म्हणून २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे काल २६ जानेवारी २०२३ रोजी पंचायत समिती अंतर्गत तसेच भामरागड पोलीस उपविभागातील आरेवाडा या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल गावात सिआरपीएफचे ४४ जवान, जिल्हा पोलीसचे ०४ जवान त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे,पोउपनि बागल व भामरागड क्युआरटीचे २० जवानासोबत विनोद पुसलवार केंद्रप्रमुख भामरागड़ केंद्र, ग्रामसेवक तोकलवार, सरपंच सडमेक डाक्टर सौ. भारती  किरणकर आणि ड़ॉ. सतिश किरणकर या सर्वानी मिळून गावकऱ्यासह मौजा आरेवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे  ७४ वा प्रजासत्ताक दिन ग्रामस्थांबरोबर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos