महत्वाच्या बातम्या

 गणपूर रै. येथे लोकमान्य टिळक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील गणपूर रै. येथील लोकमान्य टिळक विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुरेश मांडवगडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गणपूर रै. चे सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जिवनदास भोयर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निलकंठ कुमरे, आनंदराव तुमडे, माणिक सोनटक्के, मुख्याध्यापक बी.एस. बावणे, बंडु मेदाळे, होमदेव कुरवटकर, रामदास कस्तुरे, विनोद राऊत, पवन सोनटक्के आदी उपस्थित होते.

ध्वजारोहण संस्थेचे सचिव सुरेश मांडवगडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थी नुतन तेजराम राऊत, पांडुरंग टुमदेव सातर, फिरोज नरेंद्र परसोडे, वैभव मोहन वाकुडकर, करीष्मा महेश आंबटकर, हर्षद सुभाष झुमडे , नयन देवराव सोनटक्के, स्वाती सुनिल दंडीकवार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व पटवून देत सविस्तर माहिती दिली. शिक्षक लक्ष्मण कडूकर यांनी स्वर्ग से सुंदर देश हमारा हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वर्ग 10 वीची विद्यार्थिनी श्रेया साईनाथ चिताडे, ईश्वर अरविंद देवाडे यांनी इंग्रजी मध्ये भाषण देत उपस्थितांची मने जिंकली. युवरानी सुभाष मांडवगडे हिने देशभक्तीपर गीत सादर केले. सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जिवनदास भोयर, शिक्षक आबाजी वाघाडे यांनीहरी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मुख्याध्यापक बावणे यांनी केले. संचालन शिक्षक डी.आर. दुर्गे यांनी केले. आभार शिक्षक लक्ष्मण कडूकर यांनी मानले. 






  Print






News - Gadchiroli




Related Photos