महत्वाच्या बातम्या

 दत्ता डिडोळकरांचे नाव मागे घ्या, या मागणीसाठी वसंतराव कुलसंगे यांचे उपोषण सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील बांधकाम सुरू असलेल्या एका सभागृहास आर.एस. एस. चे नेते दत्ता डिडोळकरांचे नाव देण्याचा विद्यापीठ सिनेटचा ठराव रद्द करावा. व सदर सभागृहास थोर स्वातंत्र्य संग्राम सैनिक वीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध आदिवासी नेते तथा राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समितीचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव कुलसंगे यांनी दुपारी 4 वाजता पासून गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात डीडोळकरांच्या नावाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून  अनेक आदिवासी दलित व बहुजन समाजातील संघटनांनी  हा ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीला संपूर्ण राज्यातून भरघोस पाठिंबा मिळत असून विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, सामाजिक संगठना, आमदार, खासदार यांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ आदिवासी नेते वसंत कुलसिंगे यांनी आमरण उपोषणाला प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात केलेली आहे. या उपोषणाला समाजातील विविध स्तरातून व्यापक पाठिंबा मिळत असून येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे . दरम्यान आपली मागणी पूर्ण होईपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका वसंतराव कुलसंगे यांनी घेतलेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos