महत्वाच्या बातम्या

 अहेरीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक मतदार यादीचा कार्यक्रम घोषित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सचिव राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र, मुंबई यांचे 04 ऑक्टोंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर  2022 या कालावधीत 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीं  तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा  कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत वांगेपल्ली, वट्रा खुर्द स. व किष्टापुर दौड, इत्यादी  ग्रामपंचायतीच्या समाविष्ट असून मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणूकीचे टप्पे प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा 13 ऑक्टेांबर 2022 (गुरुवार), हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 13 ऑक्टेांबर 2022 ते 18 ऑक्टोंबर 2022 पर्यंत, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करणे, 21 ऑक्टोंबर 2022,  ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय मतदार यादीवर संबंधित ग्रामपंचायतीचे मतदार नागरिकांकडून हरकती व आक्षेप असल्यास विहीत कालावधीत या कार्यालयीन वेळेत दाखल करण्यात यावे असे तालुका निवडणूक अधिकारी, तथा तहसिलदार, अहेरी यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos