कोटपा कायदा २००३ अंतर्गत तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामाला जाणून ३१ ऑक्टोबर रोजी नगर परिषद गोंदिया व मुख्य रेल्वे स्थानक परिसरात तंबाखू विक्रेत्यांवर कोटपा कायदा २००३ अंतर्गत पोलीस विभाग, नगर परिषद व आरोग्य विभाग यांच्या सहयोगाने कारवाई करण्यात आली.
कोटपा कायदा २००३ अंतर्गत कलम ४ नुसार सार्वजनिक क्षेत्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनावर बंदी, कलम ५ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम ६ (अ) नुसार अल्पवयीन व्यक्तीस तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय गुन्हा व कलम ६ (ब) नुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी तसेच कलम ७ नुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वेस्टनवर धोक्याची सूचना देणे बंधनकारक आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी जसे- रेल्वे स्टेशन, दवाखाना, शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, शासकीय/अशासकीय कार्यालये इत्यादी तसेच शाळा व दवाखाना यांच्या १०० मीटर परिसरात व तंबाखूजन्य पदार्थ (खर्रा/गुटखा/पान मसाला) सेवन करतांना किंवा विक्री करतांना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदर धाड सत्रात कलम ६ (ब) अंतर्गत ३ व कलम ७ नुसार १० तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली व त्यांचेकडून रु.२६००/- चा दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक गोंदिया शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.आडे, गजानन चौव्हाण, नगर परिषद जनसंपर्क अधिकारी एस.आर.मुक्कावार, जिल्हा सल्लागार डॉ.शैलेश कुकडे, सुरेखा मेश्राम, संध्या शंभरकर, तार्केश उके, संदिप लांबकासे यांनी केले.

   Print


News - Gondia | Posted : 2018-11-03


Related Photos