महत्वाच्या बातम्या

  प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण


- विरपत्नी, विरमातांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

- पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधिक्षक नूरुल हसन, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अपर पोलिस अधीक्षक सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होते. यावेळी विरपत्नी व विरमातांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात विरमाता शांताबाई वरहारे, विरमाता नलीनी टिपले, विरपत्नी जयश्री चौधरी यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या कायाकल्प योजनेतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणाला प्रथम पुरस्कार तर प्राथमिक आरोग्य केंद्र साहूर, हमदापूर, जळगाव, अल्लीपूर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उत्कृष्टपणे राबविल्या बद्दल कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथील डॉ. आशिष देशपांडे व आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉ. अभ्युदय मेघे यांना पुरस्कार देण्यात आले.

हिंगणघाट पोलिस स्टेशन मधील सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटणकर, उपनिरिक्षक सोमनाथ टापरे, उपनिरिक्षक पपीन रामटेके व पुलगाव पोलिस स्टेशन मधील महिला पोलिस अंमलदार सिमा दुबे यांना पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय जांबोरीमध्ये सहभागी झाल्याबद्दल रुग्वेद वघळे व संघ तसेच राजस्थान येथील पालीमध्ये आयोजित 18 व्या राष्ट्रीय जांबोरीमध्ये सहभागी झाल्याबद्दल रितीका नेवारे चाणक्य स्कुल, विशाखा सायंकार राणी लक्ष्मीबाई संघ, धिरज सायंकार भगतसिह ग्रुप, चेतन वानखेडे जगजिवनराम हायस्कुल, ओम निकोडे यशोदिप कॉन्व्हेंट, घृणेश्वरी ढाले एसएसएनजे महाविद्यालय व मोहिनी मसराम यांचा सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात झालेल्या पथ संचलनात उत्कृष्ट पथ संचलनाचा प्रथम पुरस्कार पोलिस मुख्यालय, द्वितीय पुरस्कार एनसीसी पथक तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार बीडीएम कॉन्व्हेंटला देण्यात आला. उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रथम पुरस्कार न्यु इंग्लीश हायस्कुल, द्वितीय अग्रग्रामी हास्कुल तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सेंट अँथोनी स्कुलला देण्यात आला.





  Print






News - Wardha




Related Photos