अाॅनलाइन शॉपिंगच्या विरोधात मोहीम : व्यापाऱ्यांनी ऑर्डर देऊन वस्तू स्वीकारण्यास दिला नकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नाशिक :
अाॅनलाइन कंपन्यांमुळे व्यापारी वर्ग संतापला असून संगमनेर शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत अाॅनलाइन कंपन्यांच्या विराेधात अनाेख्या पद्धतीने दंड थाेपटले. व्यापाऱ्यांनी किंमती व अवजड वस्तूची ऑनलाईन पद्धतीने मागणी करून ती स्वीकारण्यास नकार दिल्याने ऑनलाईन कंपन्यांच्या नाकी नवं आले आहे . 
दसऱ्यापासूनच येथील बहुतांश व्यापाऱ्यांनी अाॅनलाइन कंपन्यांकडे रेफ्रिजरेटर, वाॅशिंग मशीन्स, एलईडी, कुलर, गाद्या, फर्निचर यांसारख्या अाकाराने माेठ्या वस्तूंच्या अाॅर्डर केल्या, मात्र त्याची डिलिव्हरी घेण्यास एेनवेळी नकार दिला. त्यामुळे कुरियर कंपन्यांचे गाेडाऊन्स गच्च भरले असून त्यांना रस्त्यावर पार्सल ठेवण्याची वेळ अाली अाहे. अातापर्यंत दाेन हजारांवर अाॅर्डर्स नाकारल्याचा या व्यापाऱ्यांचा दावा अाहे. याच पद्धतीची मोहीम सुरतमध्येही सुरू झाली आहे. आतापर्यंत १०० कोटींच्या वस्तू परत पाठवल्याचा दावा येथील व्यापाऱ्यांनी केला. नगर, नाशिकच्या व्यापाऱ्यांमध्येही अशी ‘चळवळ’ राबवण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच हे लाेण राज्यभर पसरण्याची शक्यता अाहे.
सणासुदीत बहुराष्ट्रीय अाॅनलाइन शाॅपिंग कंपन्यांमुळे स्थानिक बाजारपेठेतील विक्री कमी हाेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत अाहे. अाकर्षक अाॅफर्समुळे ग्राहक अाॅनलाइन कंपन्यांकडे अाकृष्ट हाेत असून त्याचा स्थानिक व्यापाऱ्यांना फटका बसत अाहे. या पार्श्वभूमीवर अाॅनलाइन कंपन्यांना जेरीस अाणण्यासाठी संगमनेरचे माेबाइल विक्रेते व इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येत विराेधाची ही ‘चळवळ’ राबवण्याची कल्पना अमलात अाणली. अांदाेलनामुळे स्थानिक बाजारातील मंद झालेली उलाढाल पुन्हा सुरू झाली अाहे.

   Print


News - Rajy | Posted : 2018-11-03


Related Photos