सि .एम. चषकात सहभागी होऊन आपल्या क्रीडा कौशल्यातून जिल्ह्याचा नाव मोठं करा : आमदार डॉ. देवराव होळी


- गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सी.एम. चषकाचा शुभारंभ सोहळा संपन्न 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतातील सर्वात मोठ्या सि .एम. चषकाचे आयोजन आपल्या गडचिरोली विधानसभेतही करण्यात आले असून विधानसभा क्षेत्रातून विजयी संघांना व खेळाडूंना जिल्हा व त्यानंतर राज्य स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असल्याने आपल्या जिल्ह्याचे नाव राज्य स्तरावर विजय मिळवून मोठं करण्याची संधी आपणाला मिळणार आहे. त्या संधीचे सोने राज्यस्तरीय जिंकण्यासाठी खेळावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी सी.एम. चषकाचा शुभारंभ सोहळ्या प्रसंगी केले. 
यावेळी खासदार तथा गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष अशोक नेते,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता भांडेकर, न.प. अध्यक्षा योगिता पिपरे, नगर पंचायत चामोर्शी व धानोराच्या नगराध्यक्षाच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ सोहळा थाटात संपन्न झाला. सर्वप्रथम गडचिरोली शहरातून रॅली काढण्यात आली. गडचिरोली क्रीडा प्रबोधनी येथील अटल क्रीडा नगरीमध्ये आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, डॉ. भारत खटी, भाजपा शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, प.स. उपसभापती विलास दशमुखे, चामोर्शी न.प. अध्यक्षा प्रज्ञा उराडे, धानोरा न.प. अध्यक्षा लीनाताई साळवे, न.प. उपाध्यक्ष विलास भांडेकर, धानोरा भाजप तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, चामोर्शी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, सी.एम.चषक जिल्हा संयोजक अनिल तिडके, विधानसभा संयोजक गणेश नेते, दलित आघाडी जिल्हाध्यक्ष डी. के. मेश्राम, महामंत्री जनार्धन साखरे, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, दत्तू माकोडे, सी.एम. वॉर रूमचे निकेश कुकडे, आयोजन समितीचे संयोजक अविनाश महाजन, प्रशांत येग्लोपवार, निखिल चरडे, नरेश अल्सरवार, सारंग साळवे, जिल्हा परिषदेचे सदस्य, गडचिरोली चामोर्शी व धानोराचे न.प. सभापती नगर सेवक प.स. सदस्य, नगर सेवक, भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-03


Related Photos