इम्पिरेकल डेटा मागितल्यावरून मिर्च्या का झोंबल्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना सवाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी घातलेल्या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी काल घडले ते लाजिरवाणी होते, आपल्या संस्कृतीला साजेसे नाही, शरमेने मान खाली जाईल असे कालचे दृश्य होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. 
बाळासाहेब थोरात हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहे. त्यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला. माझ्या पहिल्याच कारकिर्दीत मला हा प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे मी अवाक् झालो. एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.” असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवले. ज्या पक्षाने केले त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते, ही आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणे नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 
भास्कर जाधव यांच्यासोबत दालनात घडले ते संपूर्ण वर्णन त्यांनी केलेले नाही, ते शिशारी आणणारे होते  महाराष्ट्रात असे  घडू शकते यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, असे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले
केंद्राकडे इम्पिरेकल डेटा मागितला, राज्यपालांना सुद्धा आम्ही ही विनंती केली होती ही माहिती केंद्राकडे आहे ती मिळवण्यासाठी आम्हाला मदत करा. तोच ठराव आम्ही विधिमंडळात केला तर यात चुकीचे काय आणि एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? ओबीसी समाजाच्या बाबतीत जर आपल्या मनात द्वेश असेल तर तो वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रकट करु शकत होता, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
महाराष्ट्राच्या विधानसभेला अध्यक्ष कधी मिळणार? या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक घेणे शक्य झाले नाही. परंतु कोरोना परिस्थिती आटोक्यात येईल तेव्हा निवडणूक घेऊ. या संदर्भात मी राज्यपालांना देखील कळवले आहे.




  Print






News - Rajy | Posted : 2021-07-06






Related Photos