महत्वाच्या बातम्या

 जागरूक मतदार बना : प्राचार्या डॉ. शारदा महाजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : विकासासाठी, सुरक्षेसाठी, चांगल्या जीवनासाठी जागरूक नागरिकांसोबतच जागरूक मतदार बनणे आवश्यक आहे. जागरूक मतदार झाल्याशिवाय काहीही सकारात्मक घडणार नाही आणि सरकारला जाब विचारण्याचा अधिकार राहणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने जागरूक मतदार बनून कर्त्यव्य पार पाडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी केले. गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित मतदार दिवसा निमित्त शपथ ग्रहण कार्यक्रम आणि मतदार जागरूकता या विषयावर स्लोगन स्पर्धेच्या परीक्षण प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. यावेळी स्लोगन स्पर्धेचे परीक्षक म्हणून एस.एस महिला महाविद्यालयाच्या प्रा. अलका पाटील, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. शीतल जुनेजा बॅनर्जी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्चना जैन, डॉ. उमेश उदापूरे, डॉ. सुनील जाधव, प्रा. योगेश भोयर, डॉ. अंबादास बाकरे, डॉ. एफ एम शहा, प्रा. सुभाष पाथोडे उपस्थित होते. मतदार जागरूकता या विषयावर घेण्यात आलेल्या स्लोगन स्पर्धेत २३ विध्यार्थी सहभागी झाले. यात बी.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी वर्षा मडावी हिने प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय क्रमांक बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आचल वडगाये तर तृतीय क्रमांक एकादशी वाढई हिला मिळाला. प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी यावेळी उपस्थितांना मतदारांच्या कर्त्यव्याची शपथ दिली. सुदृढ लोकशाहीसाठी, विकसित जीवनासाठी मतदानाची कर्तव्ये जागरूकपणे पार पडणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्राचार्या महाजन यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचे डॉ. एच. पी. पारधी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. एस. जे. चौरे व प्रा. घनशाम गेडेकर यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gondia




Related Photos