मानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर पोहोचणे एवढेच एक ध्येय : ना. राजकुमार बडोले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज 
: माणसाला  प्रज्ञा,  शिल,  करुणेची शिकवण  देणा-या तथागत  गौतम बुद्धांचा धम्म  जगाच्या  काना कोपर्‍यात  पोहचवून माणसाला माणसात आणणा-या स्वातंत्र  बंधुता  व न्याय या तत्त्वावर  आधारीत  देशाला राज्यघटना देणा-या  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे केवळ स्मारक  उभारून त्यांना मोठं करणे एवढाच उद्देश  नाही  तर या माध्यमातून  मानवता धर्माचा   प्रचार  आणि प्रसार  जगभर पोहोचणे हा या मागचा खरा उद्देश  असल्याचे  प्रतिपादन  राज्याचे  सामाजिक व न्याय  मंत्री  राजकुमार  बडोले यांनी केले. 
देसाईगंज  येथील  पदस्पर्श  पावन दिक्षाभुमीच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित  कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी  ते बोलत होते.  यावेळी   आदिवासी विभागाचे  राज्यमंञी तथा गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री  राजे अम्ब्रीशराव  आञाम, आमदार  कृष्णा  गजबे, नगराध्यक्षा शालु दंडवते, गट नेते किसन नागदेवे,उपाध्यक्ष  मोतीलाल  कुकरेजा,  भन्ते बुद्धशरण, उमाकांत  ढेंगे,  गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, नगरसेवक  राजु जेठानी,गडचिरोलीचे  सहायक  आयुक्त  राजेश  पांडे,  डाॅ. सिद्धार्थ  गायकवाड, भरत जोशी, राहुल  अन्वीकर, अनिरुद्ध वनकर, पंढरी गजभिये,  श्रावण बोदेले, नगरसेविका  करुणा गणविर, माजी सभापती  प्रिती शंभरकर,समाज कल्याण अधिकारी  पेंदाम आदी मान्यवर  प्रामुख्याने उपस्थित होते. 
      ना. बडोले आपल्या  मार्गदर्शनपर भाषणात  पुढे म्हणाले की  आदिवासी  बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील देसाईगंज येथील  दिक्षाभुमी ही आपल्यासाठी  असा अनमोल ठेवा आहे ज्याची जोपासना करून  समाजात  मानवतावाद  रुजवणे प्रत्येकाचे नैतिक  कर्तव्य आहे.  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आता मोठं करण्याची  वेळ नाही  तर त्यांची जगभर  पसरलेली महती त्यांच्या  मोठेपणाची केव्हापासुनच साक्ष देत आहे.  त्यांनी दिलेल्या भारतीय  राज्य घटनेमुळेच माझ्या सारखा सर्वसामान्य माणूस  राज्याचा मंञी बनु शकला हे आमचे सौभाग्य  असले तरी त्यांच्या नंतर  समाजासाठी आम्ही काय  केले ? हा खरा संशोधनचा प्रश्न आहे. राज्यात सत्ता  कोणाची आहे  हे महत्वाचे नाही.   तर भारतीय  राज्यघटनेनुसार  सर्वांना जे मानवतावादी  अधिकार  प्राप्त  झालेत, त्याची जाणिव  सर्वांनी ठेवणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. 
 पदस्पर्श  पावन दिक्षाभुमीला तब्बल  ६४ वर्षानंतर सुशोभीकरणासाठी ५४ लाख  २० हजाराच्या कामाला मंजूरी मिळाली असून  हे काम  सार्वजनिक बांधकाम  विभागाच्या माध्यमातून  करण्यात  येणार असले तरी हा निधी येथील  विकासाठी पुरेसा नसून हे बांधकाम  होताच येथील  आवश्यक  बांधकामासाठी तत्काळ पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट  करून  केवळ महाराष्ट्रातच नाही तर जिथे कुठे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झाले आहे, अशा  सर्व ठिकाणांचा  ऐतिहासिक  स्थळे म्हणुन  घोषित करून  विकास करण्याचे काम  हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी  आवर्जून सांगितले. 
 अध्यक्षीय भाषणात  ना. अम्ब्रीशराव   आञाम  म्हणाले की,  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  पदस्पर्शाने पावन झालेली  गडचिरोली जिल्ह्य़ातील ही एकमेव  दिक्षाभुमी आहे.  या दिक्षाभुमीचा जलदगतीने  विकास  व्हावा यासाठी  आमदार  कृष्णा  गजबे  यांनी  सातत्याने  केलेल्या  पाठपुराव्यामुळेच येथील विकास कामांना गती  देण्याचे काम युद्ध स्तरावर  सुरू  करण्यात आले . असे  असले तरी ही पावन भुमी जगप्रसिद्ध  करण्यासाठी  हे स्थळ क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणुन  घोषित करून  टप्प्या टप्प्याने येथील  वास्तु ऐतिहासिक  स्थळ बनविण्यासाठी विषेश  करुन  प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. 
 सम्यक जागृती  बौद्ध महिला मंडळ यांच्या  प्रयत्नाने  सूरू झालेल्या  या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून  आभार  व्यक्त केले जात  असून  कार्यक्रमाचे संचालन  प्रकल्प  समन्वयक  समाज कल्याण  विभाग नागपुरचे बादल श्रिरामे,प्रास्तविक  कार्यकारी अभियंता  प्रकाश  बुब यांनी  तर आभार  गडचिरोलीचे  सहायक आयुक्त  राजेश  पांडे यांनी मानले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-03


Related Photos