पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास


- १० हजारांचा दंडही ठोठावला, वर्धा येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणार्या काकास वर्धा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश १ मंगला धोटे यांनी कलम ३२६ भादंवी नुसार ५  वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
किसना चंपत आराडे (५०) असे रा. सातखेडा ता. देवळी असे आरोपीचे नाव आहे. २५ आॅगस्ट २०१४ रोली फिर्यादी मनोज लक्ष्मणराव आराडे घरी जेवन करीत असताना आरोपी किसना आराडे याने घराकडे जाण्याच्या रस्त्यावरून वाद घातला. यावेळी आरोपीने कुऱ्हाडीने मारहाण केली. यामध्ये मनोज जखमी झाला. सर खटल्यामध्ये सहाय्यक शासकीय अभियोक्ता विनय आर. धुडे यांनी शासनातर्फे एकूण सात साक्षीदार तपासून युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी पोलिस हवालदार फरताडे व सहाय्यक फौजदार विजय ढवळे यांनी साक्षदारांना हजर करण्यात मोलाची कामगिरी बजावली. 

   Print


News - Wardha | Posted : 2018-11-02


Related Photos