महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पंदीलवार यांचे भाजपात प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात काँग्रेसचे नेते तथा काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पंदीलवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज बुधवारीला गडचिरोलीत भाजपाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करून काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. विशेष म्हणजे पंदीलवार यांच्या अर्धांगिनी या जिल्हा काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत. पंदीलवार यांच्या भाजपा प्रवेशाने काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. पंदीलवार यांचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार अशोक नेते, आ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे तसेच गडचिरोली भाजपा जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम, बाबुराव कोहळे, प्रशांत वाघरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos