वासाळा मार्गावर असलेल्या खुल्या विद्युत रोहित्रामुळे अपघाताचा धोका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / ठाणेगाव :
येथून वासाळाकडे जाणाऱ्या मार्गावर शेतामध्ये असलेल्या खुल्या विद्यूत रोहित्रामुळे शेतशिवारात जाणारे शेतकरी तसेच नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. 
विद्युत रोहित्राची उंची अत्यंत कमी असल्यामुळे लहान मुलांचे हातसुध्दा सहज पोहचू शकते. यामुळे केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून रोहित्राला झाकण लावावे. तसेच सुरक्षित उंचीवर रोहित्र बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-02


Related Photos