बाबासाहेबांचे विचार जगतांना बुध्दांच्या तत्वांशी सुसंगत रहावे : ना.राजकुमार बडोले


- दिक्षाभूमी परिसर सुशोभीकरण कामाचे भुमिपूजन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जगाला प्रज्ञा, शिल आणि करुणेची शिकवण देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर  यांच्या  पदस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभुमीवर असलेल्या वास्तुचे नुतनीकरण, परिसराचे सुशोभिकरण, स्वच्छतागृहाचे बांधकाम आदि. कामाचा शुभारंभ करतांना मला अत्यानंद होत आहे. परंतु समाजानी बाबासाहेबांचे विचार जगतांना बुध्दांच्याही तत्वांशी  सुसंगत रहावे असे  विचार काल सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
देसाईगंज येथील दिक्षाभुमि परिसराचे सुशोभीकरण  शुभारंभाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, आमदार क्रिष्णा गजबे, नगराध्यक्षा शालुताई दंडवते, उपाध्यक्ष  मोतीलाल कुकरेजा, नगरपरिषद गटनेते किसन नागदेवे, गोंदिया पंचायत समितीचे सभापती ढेंगे, राजु जेजाणी, सहाय्यक आयुक्त विनोद मोहतूरे , प्रकाश बुक  प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना बडोले म्हणाले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून शासनानी बहूप्रतिक्षीत असलेल्या  या दिक्षाभुमि परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. कामाचा शुभारंभ होत आहे.  कामाचा दर्जा, सौंदर्यीकरण उत्तमरित्या होईल याची बांधकाम विभागांनी  कटाक्षानी लक्ष घालावे.  याच दिक्षा भुमिवर ५ कोटी रुपयाची एक विशाल वास्तु उभि राहावी याकरीता प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात येईल असेही आश्वासन यावेळी बडोले यांनी दिले. या भुमिचा विकास झाला पाहिजे अशी माझी मनिषा होती आणि आज ती फलद्रृप झाली.  संपुर्ण राज्यात अशा ऐतिहासिक वास्तुच्या / स्थळाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे. सर्व स्मारके वाचनालय व्हावीत.  युवकांच्या ठिकाणी ज्ञानाचा भांडार तयार होउुन आपला देश सर्वांगिण विकसीत व्हावा याकरीता वाचनालयाची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम आपल्या भाषणात म्हणाले की,  बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची घटना आपल्या देशाला दिली. या संविधानामुळेच लोकशाही सुदृढ होऊन देश सुजलाम् सुफलाम् होईल.  बाबासाहेबाचे विचार सदैव प्रेरणादायी राहणार आहेत. सामाजिक विभागानी  या दिक्षाभुमिवर एक विशाल वास्तु तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे म्हणाले. जगातील  शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान अंतभृत केलेला आहे, व त्यावर सातत्याने आकलन केले जाते. अशा महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत मला यायला मिळाले हे माझे सौभाग्य आहे असे पालकमंत्री आत्राम म्हणाले.
याप्रसंगी आमदार क्रिष्णा गजबे, नगराध्यक्षा दंडवते, किसन नागदेवे आदींची समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन कोसे यांनी केले.

                                                                   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-02


Related Photos