पेट्रोल १८ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त


वृत्तसंस्था / मुंबई :  पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये प्रति लिटर 18 पैसे आणि 14 पैसे अशी कपात झाली आहे. गुरुवारी मुंबईत पेट्रोलचे दर 16 पैशांनी कमी झाले होते तर डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली नव्हती. आज डिझेलचेही दर प्रति लिटर 14 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 84 रुपये 68 पैसे असेल तर डिझेलचा दर प्रति लिटर 77 रुपये 18 पैसे असणार आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
दिल्लीतही पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 14 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे दिल्लीतले दर पेट्रोल 79 रुपये 18 पैसे प्रति लिटर तर डिझेल 73 रुपये 64 पैसे लिटर असे आहेत.
पेट्रोलच्या दरांनी नव्वदी गाठली होती, तर डिझेलचे दर ८० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दर काही प्रमाणात का होईना पण कमी होताना दिसत आहेत. दिवाळी तोंडावर आलेली असताना हा काही अंशी का होईना दिलासा मिळताना दिसतो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घटल्या आहेत ज्याचाच परिणाम म्हणून गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर घटत आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-02


Related Photos