महत्वाच्या बातम्या

 फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळसाहेब ठाकरे यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले - आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळसाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरवात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मालार्पण आणि दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश खांगर हे उपस्थित होते तर उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प व श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos