सोनेगावात शेतीला पाणी देण्याच्या वादातून एका इसमाची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

जिल्हा प्रतिनिधी /वर्धा : कारंजा तालुक्यातील सोनेगाव(मुस्तफा) येथे आज सकाळी ७.४५ वाजता मधुकर सिराम हे आपल्या २ मुलासह शेतात गेले असता विद्युत शेतात ओलीत करण्यासाठी विद्युत खांबावरील तोडलेले कनेक्शन जोडत असताना बन्नगरे कुटूंबानी त्याला मारहाण केली यात मधुकर सिराम वय ६० वर्षे गंभीर जखमी झाला मुलगा विलास सिराम हा किरकोळ जखमी झाला . मधुकर सिराम याला जखमी अवस्थेत घरी आणत असताना वाटेत मृत्यू झाला .

दोन्ही शेतकऱ्याचे एकाच विहिरीवरून ओलीत करत असे मात्र यावर्षी पाणी टंचाई असल्याने दोघांचे पाण्यासाठी वाद होत असायचे याच वादातुन हा खुन झाला असल्याचे गावाचे पोलीस पाटिल यांनी माहिती दिली. आरोपी श्यामसुंदर बन्नगरे सोनेगाव,सुदर्शन बन्नगरे सोनेगाव व दयाशंकर धारपूरे मासोद यांना कारंजा पोलिस स्टेशन येथें अटक करन्यात आलेली आहे पुढिल तपास ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-01


Related Photos