हिवाळी अधिवेशन केवळ नऊच दिवस घेण्याचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
हिवाळी अधिवेशनात दुष्काळाच्या विषयावर  होण्याची चिन्हे असतानाच हिवाळी अधिवेशन केवळ नऊच दिवस घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एवढ्या कमी दिवसांत दुष्काळावर चर्चा होणं शक्य नसल्याचा दावा करत अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विरोधक करत आहेत. 
कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत १९ ते ३० नोव्हेंबरपर्यंत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन २ आठवडे चालणार असून कामकाज फक्त ९ दिवस चालणार आहे. गुरुनानक जयंतीच्या दिवशी सुट्टीदिवशीही कामकाज चालणार असल्याचं सांगण्यात आलं. 
दरवर्षी किमान २५ दिवस अधिवेशन असते, मात्र यंदा हे अधिवेशन केवळ दोन आठवडेच राहणार असल्याने विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान, दुष्काळावरची चर्चा टाळण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी कमी केला. हे सरकार पळपुट्यांचे आहे, असं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. तर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी हे दोन आठवडे अधिवेशन होणार असल्याचे सांगत विरोधकांनी गोंधळ न घालता सर्व विषयावर चर्चा करावी, असं आवाहन केलं आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-01


Related Photos