मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई : तब्बल दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मुंबईत एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. तब्बल दीड कोटी रुपयांचा ड्रग्ज एनसीबीने जप्त केलेत. अमेरिकेतून भारतात आणलेले ड्रग्ज एनसीबीने जप्त केल्याचे समजते. तसेच ड्रग्जच्या पार्सलवर इमर्जन्सी फूड असा उल्लेख करण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी मुंबईतील ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्सविरुद्ध कारवाई करताना दिसत आहे. एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करुनही बऱ्याचदा ड्रग्ज जप्त केले.
आज एनसीबीने मुंबईतून 2.2 किलोचे ड्रग्ज जप्त केले. या एकूण ड्रग्जची किंमत जवळपास दीड कोटींच्या आसपास आहे. मुंबईत एनसीबीने छापा टाकत ही कारवाई केली आहे. निळ्या रंगाच्या बॉक्सवर “Mountain House 05 day emergency food supply.(इमर्जन्सी फूड)'' असे लिहण्यात आले होते. सिल्व्हर रंगाच्या फूड पॅकेट्समध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते.
या प्रकरणी एनसीबी मुंबईने गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-06-10


Related Photos