सायबर गुन्हा करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर लाॅकडाऊनच्या काळात सोशल मिडीयाचा मोठया प्रमाणात गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करून अथवा व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटर,इंन्स्टाग्राम, टिकटाॅक, ब्लुड व इत्यादी माध्यमांवर फेक अकाउंट तयार करून मैत्री करून व त्यानंतर खाजगी व्हिडीओ मागवून संबंधित व्हिडीओ कुटुंबियांना तसेच मित्र परिवारांना पाठवून पैशाची मागणी करून व धमकी देतात अश्या प्रकारचा अपराध  गडचिरोली जिल्हयात  उघडकीस आला असून सोशल मिडीयाचा वापर करीत असलेल्या सेक्सोटार्शन करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. प्रदिप नथ्थु खेवले (३९) रा.वडधा ता.आरमोरी जि.गडचिरोली असे यातील आरोपीचे नाव आहे.
व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटर,इंन्स्टाग्राम, टिकटाॅक, ब्लुड व इत्यादी माध्यमांवर फेक अकाउंट तयार करून मैत्री करतात व त्यानंतर खाजगी व्हिडीओ मागवून संबंधित व्हिडीओ कुटुंबियांना तसेच मित्र परिवारांना पाठवून पैशाची मागणी करतात व धमकी देतात. अशाच प्रकारची घटना गडचिरोली जिल्हयात घडली होती. यातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
गडचिरोली सायबर तपास यंत्रणेला अशाच प्रकारची तक्रार प्राप्त झाली  होती. पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक गौरव गावंडे, पोउपनि निलेश ठाकरे, पोहवा मेश्राम, नापोशी नैताम, नापोशी वर्षा, पोशि रोहणकर या तपास पथकाने प्राप्त तक्रारीचे तांत्रिक विश्लेषण करून उत्कृष्ट तपास करत आरोपी प्रदिप खेवले यांच्या मुसक्या आवळण्यात तपास पथकाला यश आले आहे. सदर आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरूध्द आरमोरी पोलीस स्टेशन येथे कलम ३८४,३८५,४१९ भांदवि सहकलम ६६(डी),६६(ई), ६७(ए) आय.टी.ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहे.
पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी सायबर तपास पथकाचे अभिनंदन केले असून गडचिरोली जिल्हयातील जनतेला व्हाॅट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम, टिकटाॅक व इतर सोशन मिडीयावर देण्यात येणाऱ्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका व सोशल मिडीयाचा वापर करतांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाली असल्यास त्वरीत सायबर पोलीस स्टेशनच्या 07132-222163, पोलीस नियंत्रण कक्ष गडचिरोली 07132-223149, 07132-223142 या क्रमांकावर संपर्क करण्याचे सुचविले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-06-09


Related Photos