महत्वाच्या बातम्या

 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून २३ ते २५ जानेवारी, २०२३ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० या कालावधीत चालता बोलता” या प्रश्नसरितेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, २३ ते २५ जानेवारी, २०२५ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार २४ जानेवारी, २०२३ रोजी परिषद सभागृह, मंत्रालय येथे दुपारी २:०० वाजता मंत्रालयातील आणि विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 बुधवार २५ जानेवारी, २०२३ रोजी दुपारी ४:०० ते सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत हास्यसंजीवनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनतर 

 सायंकाळी ०५:३० ते ६:०० या कालावधीत अभिवाचन स्पर्धेचा बक्षिस समारंभ होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.





  Print






News - Rajy




Related Photos