शंकरपूर - मूत्तापूर - वेलगुर रस्ता बांधकाम व डांबरीकरण कामाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याहस्ते भूमिपूजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी :
तालुक्यातील  ग्राम पंचायत  वेलगुर  अंतर्गत येत असलेल्या शंकरपूर - मूत्तापूर - वडलापेठ - वेलगुर  रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी निवडणुकीच्या वेळी केली होती. त्यानुसार जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नागरिकांची  अडचण लक्षात घेवुन ३०५४ - ०४०७ योजने तुन रस्ते व पुल बांधकाम  अंतर्गत २७ लाख लाख रुपयांच्या कामास मंजुरी मिळवून घेतली. . सदर रस्त्याच्या कामाचे  भूमिपूजन जि.प.उपाध्यक्ष  अजय कंकडलावार यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी  पंचायत समिती सदस्या  गीताताई चालुरकर ,माजी उपसरपंच  उमेश मोहूर्ले, माजी सरपंच लालू करपेत, किष्टापूर चे माजी सरपंच भगवान आत्राम, अशोक येलमूले, साईनाथ नागोसे, मुकुंद वासवे, तुळशीराम बोरूले, बळीराम सोनूले, महेंद्र वासवे, नागोराव सोनूले, अरुण दुर्गे व शंकरपूर येथील नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-01


Related Photos