महत्वाच्या बातम्या

 शिक्षकांच्या नियमीत वेतनासाठी शिक्षणमंत्र्यांना निवेदन


- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी   

- वेतनाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे दिवाळीपासुन मासिक वेतन आर्थिक तरतुद अपुरी येत असल्याने अनियमित होत आहेत. त्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वेळोवेळी अपुरा निधी येत असल्याने जिल्हा परिषद दर महिण्याला दोन ते तीन  तालुक्याचे वेतन थांबवत आहे. जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांचे वेतन एकाचवेळी होत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. अनियमित वेतनामुळे शिक्षकांना ज्यादा व्याजाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पुरेशी आर्थिक तरतुद उपलब्ध उपलब्ध होत नसल्याने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या थकीत रकमा, अर्जित रजा, वैद्यकीय परिपुर्तीचे देयके प्रलंबित आहेत. या सर्व प्रलंबित देयकांसाठी व नियमित वेतनासाठी मागणी प्रमाणे निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्यपदाधिकारी यांनी शालेय शिक्षणमंञी दिपक केसरकर यांची २० जानेवारी २०२३ रोजी सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केलेली आहे.

वेतनाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. हा प्रश्न न सुटल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, राज्यकोषाध्यक्ष संभाजी बापट, पांडु केने यासह आदी राज्यपदाधिकारी यांनी दिलेला आहे. असे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, आशिष धाञक, राजेश चिल्लमवार, शिलाताई सोमनकर, सुरेश पालवे, सुरेश वासलवार, लोमेश उंदिरवाडे, अशोक राॅयसिडाम, निलकंठ निकुरे, देवनाथ बोबाटे, संजय कोंकमूट्टीवार यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos