राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अतिदुर्गम कोठी येथील सरपंचा भाग्यश्री लेखामी यांच्या कार्याची दखल घेत प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
अतिदुर्गम अशा भामराड तालुक्यातील कोठी या छोटयाश्या गावातील सरपंचा भाग्यश्री लेखामी यांचा सामाजिक उपक्रमातून कोविड १९ महामारिच्या कालावधीत प्रशासकीय कार्यासोबतच सामाजिक जाणीवेतून गोरगरीब नागरिकांना दिलेल्या सेवेची दखल राज्यमंत्री ओपप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी घेवून प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
भाग्यश्री लेखामी हया कोठी येथील सरंपचा तसेच अ.भा.आदिवासी विकास परिषदे गडचिरोलीच्या युवा जिल्हाध्यक्ष सुध्दा आहेत. यांनी सामाजिक उपक्रमातून कोविड -१९ महामारिच्या कालावधीत प्रशासकिय कार्यासोबतच सामाजिक जाणिवेतून गोरगरीब नागरिकांना दिलेली सेवा ही कौतुकास्पद आहे. जनसामान्याप्रती मानवतेच्या दृष्टीने जबाबदारी सांभाळून करीत असलेले समाजसेवेचे कार्य हे वाखाण्याजोगे असून निश्चितच कारोना योध्दा आहात तसेच आपले काम अतिशय कौतुकास्पद व तरूण पिढीला अधिक बळ देणारे आहे. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात एक स्त्री असून समाजातील नागरिकांप्रती करीत असलेले कार्य हे सगळया महाराष्ट्रासाठी प्रेरणादायाी आहे असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याबात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरपंचा भाग्यश्री लेखामी यांच्या कार्याची दखल घेत प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-06-04


Related Photos